घरक्रीडादबाव कशाप्रकारे हाताळतो, यावर विश्वचषक जिंकतो का हे ठरेल!

दबाव कशाप्रकारे हाताळतो, यावर विश्वचषक जिंकतो का हे ठरेल!

Subscribe

आगामी क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानले जात असले तरी आम्ही दबाव कशाप्रकारे हाताळतो, यावर आम्ही विश्वचषक जिंकतो का हे ठरेल, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्याआधी कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. बरेच संघ याआधीच इंग्लंडला पोहोचले असले तरी परिस्थतीशी जुळवून घेण्यासाठी भारतालाही पुरेसा वेळ मिळेल असे कोहलीला वाटते.

ज्या देशात विश्वचषक होणार आहे, त्या देशात काही दिवस आधीच पोहोचल्यास तुमच्यावर जो दबाव असतो तो थोडा कमी होण्यास मदत होते. आम्हाला फक्त या विश्वचषकात चांगले क्रिकेट खेळण्याची अपेक्षा आहे. चांगले क्रिकेट खेळणे हेच आमचे आधीपासून लक्ष्य होते आणि त्यामुळे आम्ही आपोआपच यशस्वी झालो आहोत. विश्वचषकासारख्या स्पर्धेत परिस्थितीपेक्षा आणि हवामानापेक्षा तुम्ही दबाव कशाप्रकारे हाताळता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

सध्याच्या घडीला भारताकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाजीची फळी आहे, असे अनेकांचे मत आहे. हे गोलंदाज काही दिवसांपूर्वी संपलेल्या आयपीएलमध्ये खेळले असले तरी ते पूर्णपणे फिट आहेत, असे कोहली म्हणाला. आमचे गोलंदाज आयपीएलमध्येही एकदिवसीय क्रिकेटमध्ये कशी चांगली कामगिरी करता येईल याबाबत विचार करत होते. त्यामुळे आयपीएलमध्ये ४ षटके टाकल्यानंतर कोणताही गोलंदाज थकलेला दिसत नव्हता. ते या विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट आहेत, असे कोहलीने सांगितले.

तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते या भारतीय संघाने जर आपल्या क्षमतेनुसार खेळ केला, तर भारत नक्कीच तिसर्‍यांदा विश्वचषक जिंकू शकेल. या भारतीय संघाने मागील काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वचषकात खेळतोय म्हणून खेळण्याच्या पद्धतीत बदल करण्याची काहीच गरज नाही. कामगिरीत सातत्य राखणे ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विश्वचषक ही मोठी स्पर्धा असली तरी तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेतला पाहिजे. जर या संघाने आनंद घेत आपल्या क्षमतेनुसार खेळ केला, तर भारत नक्कीच विश्वचषक जिंकू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -