घरक्रीडाआत्महत्येचा विचार मनात यायचा; विश्वचषक जिंकलेल्या भारतीय खेळाडूचा खुलासा

आत्महत्येचा विचार मनात यायचा; विश्वचषक जिंकलेल्या भारतीय खेळाडूचा खुलासा

Subscribe

भारताच्या २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य असलेल्या रॉबिन उथप्पाने आपल्या आयुष्यासह आणि क्रिकेटशी संबंधित मोठे खुलासे केले आहेत. कारकीर्दीत दोन वर्षे मी नैराश्यात होतो, असं उथप्पाने म्हटलं आहे. यादरम्यान त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. बाल्कनीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा विचार येत होता. केवळ क्रिकेटने आत्महत्या करण्यापासून रोखलं.

भारतासाठी ४६ एकदिवसीय आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या उथप्पाला राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलमध्ये ३ कोटींमध्ये विकत घेतलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आलं आहे. रॉयल राजस्थान फाउंडेशनच्या ‘माइंड, बॉडी अँण्ड सोल’ या लाइव्ह सत्रामध्ये उथप्पा म्हणाला, “मला आठवतं की हे २००९ ते २०११ दरम्यान नैराश्यात होतो. मला दररोज आत्महत्या करण्याचा विचार मनात येत होता. मी त्यावेळी क्रिकेटबद्दल विचारही करत नव्हतो.” तो पुढे म्हणाले, “मला वाटायचं की आजचा दिवस कसा जाईल? उद्याचा दिवस कसा असेल? माझ्या आयुष्यात काय घडत आहे आणि मी कोणत्या दिशेने जात आहे. या विचाराने मनात काहूर माजला होता. पण क्रिकेटने या गोष्टी माझ्या मनातून काढल्या. जेव्हा क्रिकेटचे सामने नसायचे तेव्हा खूप त्रास व्हायचा.”

- Advertisement -

हेही वाचा – स्थलांतरित मजुरांना मोठा धक्का, 256 श्रमिक विशेष गाड्या रद्द


उथप्पा म्हणाला, “त्या दिवसांत मी बाल्कनीतून उडी मारावी असा विचार करत बसायचो. पण कोणत्या तरी गोष्टीनं मला रोखून धरलं. त्यावेळी त्यांनी डायरी लिहायला सुरुवात केली.” पुढे तो म्हणाला, “मी माणूस म्हणून स्वत: ला समजून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर, बाहेरुन मदत घेतली, जेणेकरून मी माझ्या आयुष्यात बदल घडवून आणू शकेन.” जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये भारत अ संघाचा कर्णधार असूनही त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती तेव्हाचा हा काळ होता. तो म्हणाला, “माहित नाही का… मी खूप प्रयत्न करीत होतो, पण धावा होत नव्हत्या. माझ्यात काही तरी चूका आहेत यावर विश्वास ठेवण्यास मी तयार नव्हतो. आपण कधीकधी मानसिक त्रास असल्याचं मान्य करत नसतो.” यानंतर उथप्पाने २०१४-१५ रणजी मोसमात सर्वाधिक धावा केल्या. त्याने अद्याप क्रिकेटमधून संन्यास घेतलेला नाही. परंतु त्याने असं म्हटलं आहे की ज्या प्रकारे त्याने आपल्या जीवनाच्या वाईट टप्प्याचा सामना केला त्याबद्दल त्याला काही खेद वाटत नाही आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -