ऑलिम्पिकसाठी निखत- मेरी कोम यांच्यात चाचणी लढत

Mumbai
मेरी कोम

टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठी माजी विश्वविजेत्या मेरी कोमला 51 किलो गटासाठी युवा बॉक्सर निखत झरीन हिच्याविरुद्ध चाचणी लढत खेळावी लागणार आहे. निखतने केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना पत्र लिहून ऑलिम्पिक मुष्टीयुद्धात महिलांच्या 51 किलो वजनी गटात आपली दावेदारी सांगितली आहे. त्यामुळे अनुभवी मेरी आणि नवोदित निखत चाचणी लढतीत एकमेकींना भिडणार हे स्पष्ट झाले आहे. मुष्टियुद्ध महासंघानेही ( बीएफआय ) या लढतीला मंजुरी दिली आहे. याशिवाय महिलांच्या 69 किलो वजनी गटातील ऑलिम्पिक पात्रतेसाठी लोवलिना बोर्गोहेन हिलाही चाचणी लढत खेळावी लागेल, अशी माहिती बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिली.डिसेंबर महिन्यात निखत आणि मेरी कोम यांच्यातील ही चाचणी लढत होऊ शकते.

अन्यथा तिने रौप्य अथवा सुवर्णपदक पटकावले असते तर ऑलिम्पिकसाठी तिला थेट प्रवेश मिळाला असता. परंतु, माजी विश्वविजेत्या मेरी कोमला यंदाच्या जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. मेरीने चाचणीसाठी कधीही नकार दिलेला नाही. ेपण तिचा प्रदीर्घ अनुभव पाहता तिलाच हिंदुस्थानसाठी टोकियोला पाठवण्याचा विचार बीएफआयने केला होता. पण निखतच्या दावेदारीमुळे मेरीला आता 51 किलो वजनी गटातून ऑलिम्पिक पात्रतेसाठी चाचणी लढत खेळावी लागेल.

निखत आणि मेरी कोम यांच्यातील ऑलिम्पिक चाचणी लढतीबाबत गुरुवारी हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाच्या (साई ) मुख्यालयात विशेष बैठक झाली. या बैठकीला बीएफआय आणि साईच्या पदाधिकार्‍यांसह साईचे महानिदेशक संदीप प्रधान, क्रीडा मंत्रालयाचा एक अधिकारी, दोन विदेशी कोच राफेल बर्गमैस्को और सैंटियागो नीवा हेही उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here