घरक्रीडाकसोटी क्रिकेटमधून नाणेफेक गायब होणार?

कसोटी क्रिकेटमधून नाणेफेक गायब होणार?

Subscribe
कोणत्याही क्रिकेट सामन्याआधी होणारी नाणेफेक ही बऱ्याचवेळा संघ हरणार की जिंकणार याचे संकेत देत असते. क्रिकट चा उदय झाल्यानंतर पासून नाणेफेक प्रक्रिया ही पूर्वापार पासून चालत आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेकीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. नाणेफेक जिंकलेला संघ खेळपट्टीचे रुप पाहून प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी हे नाणेफेकीनंतर ठरवत असतो. मात्र आयसीसीच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात कसोटी क्रिकेटमधून नाणेफेक बंद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पाहुण्या संघाच्या कर्णधाराला प्रथम फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते.
आतापर्यंत अनेक प्रसंगांमध्ये, यजमान संघाच्या जमेच्या बाजू लक्षात ठेऊन खेळपट्टी बनवली जात असे. असे करणे चुकीची नसले तरीही त्यामुळे अनेकदा कसोटी सामने एकतर्फी होतात. कसोटी सामन्याची खेळपट्टी तयार करताना यजमान संघाचे मत विचारात घेतले जाणे हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी नाणेफेकीऐवजी पाहुण्या संघाच्या कर्णधाराला गोलंदाजी किंवा फलंदाजी निवडण्याचा अधिकार द्यावा, असे मत व्यक्त केले आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर  हे सांगितले आहे. मुंबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेतला जाणार असल्याचे समजते.
इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत नाणेफेकीला रामराम करत पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, इंग्लंडचा माजी खेळाडू अँड्रू स्ट्रॉस, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, पंच रिचर्ड केटलबरो, सामनाधिकारी रंजन मगदुले, शॉन पोलॉक यांची समिती नाणेफेकीच्या या जटिल प्रश्नावर निर्णय घेणार असल्याचे समजते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -