Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा केपीएल मॅच फिक्सिंग प्रकरण - आणखी दोन भारतीय क्रिकेटपटूंना अटक

केपीएल मॅच फिक्सिंग प्रकरण – आणखी दोन भारतीय क्रिकेटपटूंना अटक

अटक करण्यात आलेल्या एका खेळाडूचा विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु या संघात निवड झाली होती.

Related Story

- Advertisement -

कनार्टक प्रीमियर लीग (केपीएल) मधील सामन्यात मॅच फिक्सिंग प्रकरणी आणखी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरुतील पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी यापूर्वी निशांत शेख या भारतीय क्रिकेटपटूला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या एका खेळाडूचा विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु या संघात निवड झाली होती.

कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांनी २०१९च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बंगळुरु ब्लास्टर्स टीमचे गोलंदाजीचे प्रशिक्षक विनू प्रसाद आणि फलंदाजीचे प्रशिक्षक विश्वनाथन यांना मागच्या वर्षी बंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्समध्ये झालेल्या मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला खेळाडू सीएम गौतम हा कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. तर तर आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमध्ये २०११ आणि २०१२ च्या हंगामात त्याचा सहभाग होता.

- Advertisement -