घरक्रीडासुवर्णकन्या 'हिमा दास' ची जात काय? गुगलवर टॉप किवर्ड

सुवर्णकन्या ‘हिमा दास’ ची जात काय? गुगलवर टॉप किवर्ड

Subscribe

हिमा दासच्या स्वत:च्या आसाम राज्यातूनच सर्वाधिक सर्च केली जातेय हिमा दासची जात. आसाम पाठोपाठ केरळ आणि कर्नाटकमधूनही टॉप सर्च हिमाची जातच

फिनलँडमध्ये पार पडलेल्या अंडर २० ‘जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत भारताच्या हिमा दासने ५१.४६ सेकंदात ४०० मीटर अंतर कापत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. तिला या कामगिरीबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले असून संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र या कौतुक सोहळ्याला एक गालबोट लावणारी घटना घडली आहे. एकीकडे सर्व भारतातून हिमावर कौतुकांचा वर्षाव होतोय तर दुसरीकडे भारतातूनच हिमा दासची ‘जात’ सध्या गुगलवर सर्वाधिक सर्च केली जात आहे.

Hima das cast search
गुगल सर्च

हिमाने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ‘ट्रॅक इव्हेंट’मध्ये भारताला मिळवून दिलेल्या सुवर्णपदकामुळे तिच्या अगदी पंतप्रधान मोदीपासून ते बीगबी बच्चनपर्यंत सर्वांकडूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग,रोहित शर्मा पी. टी. उषा,गृहमंत्री राजनाथ सिंह आणि ममता बॅनर्जी यानी हिमाचे सोशल मीडीयावर अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. १२ जुलैला म्हणजेच गुरवारी हिमाने सुवर्णपदक जिंकले, ज्यानंतर लगेचच शुक्रवारपासून हिमाची जात गुगलवर सर्वाधिक सर्च होऊ लागली आहे. हिमा दासच्या जातीच्या सर्च होण्यामुळे बऱ्याच नेटीजन्सनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

सर्वाधिक सर्च आसाममधून

हिमा दासच्या अप्रतिम कामगिरीनंतर संपूर्ण भारतातून तिची जात सर्च करण्यात येत असल्याचा वाईट प्रकार घडताना दिसत आहे. ज्यात सर्वाधिक सर्च हे आसाम राज्यातून होत आहे. विशेष म्हणजे हिमा ही आसामचीच असून तिच्याच राज्यातून तिची जात सर्वाधिक सर्च केली जात आहे. आसाम पाठोपाठ केरळ आणि कर्नाटक राज्यातूनही तिची जात सर्वाधिक सर्च केली जात आहे.

hima das1
हिमा दास सर्च इन गुगल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -