घरक्रीडायुएफा युरोपा लीग स्पर्धा

युएफा युरोपा लीग स्पर्धा

Subscribe

इंग्लंडमधील संघ आर्सनल आणि चेल्सीने युएफा युरोपा लीगच्या उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आर्सनलने युएफा युरोपा लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये इटालियन संघ नॅपोलीवर २-० अशी मात केली आहे. दुसरा इंग्लिश संघ चेल्सीने उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये स्लाव्हिया प्रागवर १-० अशी मात केली.

नॅपोलीविरुद्धच्या सामन्यात आर्सनलने पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ केला. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत आर्सनलने १५ व्या मिनिटालाच आघाडी मिळवली. ऐंसले मेटलँड-नाइल्सच्या पासवर अ‍ॅरॉन रॅमसीने हा गोल केला. हा रॅमसीचा या मोसमातील सहावा गोल होता. आर्सनलने पुढेही चांगला खेळ सुरू ठेवला आणि २५ व्या मिनिटाला कालिडू कुलिबालीने केलेल्या स्वयं गोलमुळे आर्सनलला २-० अशी आघाडी मिळाली. यानंतर पिअर एमरीक-ऑबामीयांग, मेटलँड-नाइल्स यांना आर्सनलची आघाडी वाढवण्याची संधी होती, पण त्यांना गोल करता आले नाहीत. तसेच नॅपोलीच्या पीटर झीलिंस्कीला गोल करण्याची सुरुवात सुवर्ण संधी मिळाली, पण त्याला या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही आणि हा सामना २-० असा आर्सनलने जिंकला.

- Advertisement -

मार्कोस अलोन्सोच्या गोलमुळे चेल्सीने स्लाव्हिया प्रागचा १-० असा पराभव केला. ८६ व्या मिनिटाला विलियनच्या पासवर हेडर मारत अलोन्सोने हा गोल केला. तसेच उपांत्यपूर्व फेरीच्या इतर लढतींच्या पहिल्या लीगमध्ये बेनफिकाने आईन्ट्रॅक फ्रॅन्कफोर्टला ४-२ असे, तर वेलंसियाने विल्लेरेयालला ३-१ असे पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -