घरक्रीडाUS OPEN 2018 : शारापोव्हा महिला गटात पराभूत

US OPEN 2018 : शारापोव्हा महिला गटात पराभूत

Subscribe

रशियाची स्टार टेनीसपटू शारापोव्हाला स्पेनच्या कार्ला सुआरेझ नॅवॅरोने पराभूत केले आहे. तर दुसरीकडे सेरेना विलियम्सने चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.

अमेरिकेत सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या टेनीस स्पर्धेत रशियाची ३१ वर्षीय स्टार टेनीसपटू मारिया शारापोव्हा पराभूत झाली आहे. तिचा हा धक्कादायक पराभव स्पेनच्या कार्ला सुआरेझ नॅवॅरोने केला असून तिने मारियाला ६-४, ६-३ अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केले आहे. एकेकाळची स्टार मारिया मागील काही वर्षे काही चांगला खेळ करू शकली नाहीये. तिने २०१४ साली अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे मारिया यापूर्वी रात्री झालेल्या २३ सामन्यात सलग विजयी झाली होती. या २३ विजयानंतर मारियाला आता स्पेनच्या कार्ला सुआरेझने पराभूत केले आहे.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच शारापोव्हा कुठेतरी सामन्यात कमी पडत असलेली दिसून येत होती. कार्लाने पहिल्या सेटमध्ये सुरूवातीलाच आघाडी घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि पहिला सेट ६-४ च्या फरकाने जिंकत सामन्यात १-० ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही कार्लाने अप्रतिम खेळ दाखवत ६-३ च्या फरकाने सहज सेट जिंकत सामना आपल्या नावे केला.

- Advertisement -

मारिया सोबतच दुसरीकडे टेनिसचा स्टार रॉजर उप-उपांत्यपूर्व फेरीच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचा जॉन मिलमन याने ३-६, ७-५, ७-५, ७-६ असा पराभव केला. तर राफेलने मात्र डेन्मार्कच्या डॉमिनिक थीमचा ०-६, ६-४, ७-५, ६-७ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यासोबतच मारियाची प्रतिस्पर्धी सेरेना विलियम्सने चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची ही तिची नववी वेळ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -