अमेरिकन खुली स्पर्धा: स्पेनच्या नदालने पटकावले जेतेपद

स्पेनचा रफाएल नदालने अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत नदालने चौथ्यांदा जेतेपद पटकावले आहे.

New York
Rafael Nadal
अमेरिकन खुली स्पर्धा: स्पेनच्या नदालने पटकावले जेतेपद

अमेरिकेन खुली टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात स्पेनच्या रफाएल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत विजयाच्या ट्रॉफिवर आपले नाव कोरले आहेत. विशेष म्हणजे नदालचे हे १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तर रशियाचा डॅनिल हा पहिल्यांदा अंतिम सामन्यात खेळत होता. मात्र नदालने अंतिम सामन्यात डॅनिलचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. हा सामना तब्बल पाच तास चालला.


हेही वाचा – रंगतदार सामन्यात हॉलंडची जर्मनीवर मात


 

नदाल २७व्यांदा गेला अंतिम फेरीत

ग्रँडस्लॅम स्पर्धेत रफाएल नदाल २७व्यांदा अंतिम फेरीत गेला. याशिवाय त्याने १८ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे नदालने २०१०, २०१३ आणि २०१७ सालाचे अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. नदाले उपांत्य फेरीत बेरेट्टिनीवरचा ७-६, ६-४, ६-१ असा पराभव केला होता. तर मेदवेदेवने दुसऱ्या उपांत्य फेरीत दिमित्रोचा ६-६, ६-४, ६-३ असा पराभव केला. रशियाचा मेदवेदेव अगोदर २००५ साली मरात सॅफिन हा टेनिसपटू अंतिम सामन्यात पोहोचू शकला होता. नदालने याअगोदर म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या ‘माँटेरियल’ फायनलमध्ये मेदवेदेवचा पराभव केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here