Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : विल पुकोवस्कीने केले प्रभावित; रिकी पॉन्टिंगने केली स्तुती  

IND vs AUS : विल पुकोवस्कीने केले प्रभावित; रिकी पॉन्टिंगने केली स्तुती  

पुकोवस्कीने ११० चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली.

Related Story

- Advertisement -

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्कीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना पुकोवस्कीने ११० चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात अर्धशतक झळकावणारा पुकोवस्की हा ऑस्ट्रेलियाचा ८२ वा खेळाडू ठरला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने पुकोवस्कीची स्तुती केली.

पुकोवस्कीच्या खेळीने मला खूप प्रभावित केले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना इतकी चांगली फलंदाजी करणे सोपे नाही. त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली असून याचेच त्याला फळ मिळत आहे, असे पॉन्टिंग त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. पुकोवस्कीला भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने दोन जीवदान दिले आणि याचा पुरेपूर फायदा घेत पुकोवस्कीने पदार्पणात अर्धशतक झळकावले. कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा पुकोवस्की हा ४६० वा खेळाडू ठरला.

- Advertisement -

- Advertisement -