विराट कोहलीचा पंजाबी लूक; फोटो पाहिलात का?

विराट कोहलीने आपल्या पंजाबी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकीत केले आहे.

Mumbai
Virat Kohli
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट विश्वातील आपल्या उत्कृष्ठ कामगिरीतून नेहमीच चर्चेत असतो. मात्र, सध्या तो वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. विराट कोहलीने आपला पंजाबी लूक शेअर केला आहे. हा फोटो त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटर शेअर केला आहे. या फोटोसोबत ‘सत श्री अकाल’ असे म्हणत त्याने सर्वांनानमस्कार केला आहे.

काय आहे फोटोमध्ये?

या फोटोमध्ये विराटने डोक्यावर गुलाबी रंगाची पगडी, पठानी सूट आणि काळ्या रंगाचे पंजाबी जोडे परिधान केले आहेत. विराटने उजव्या हातात कडाही घातला आहे. या फोटोमध्ये विराट हात जोडून उभा आहे. या फोटोसोबत त्याने सत श्री अकाल म्हटले आहे.

चाहते झाले आश्चर्यचकीत

विराट कोहलीचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यांना विराटचा पंजाबी लूक फार आवडला आहे. विराटच्या या फोटोला आतापर्यंत ६३ हजार लोकांनी लाईक केले आहे. तर ३८०० लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. या फोटोवर १७०० लोकांनी कमेंट केली आहे. त्यामुळे हा फोटो चाहत्यांना जास्त आवडलेला दिसत आहे.

Virat kohali Punjabi look
विराट कोहली पंजाबी लूकमध्ये