घरक्रीडाकुठेही खेळा, यश कामगिरीवरच मिळते - विराट कोहली

कुठेही खेळा, यश कामगिरीवरच मिळते – विराट कोहली

Subscribe

भारतीय क्रिकेट चाहत्यांना इंदूरमध्ये होणाऱ्या मालिका सामन्यातही भारतीय संघ बांग्लादेशचा पराभव करेल, असा विश्वास आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विराटने मैदान घरचे असो किंवा कोणतेही यश हे कामगिरीवरच मिळते, असे म्हटले.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून सुरु होत आहे. हा सामना इंदूर येथे होणार आहे. इंदूर येथील मैदानावर भारताची कामगिरी आतापर्यंत चांगलीच राहिलेली आहे. याशिवाय घरच्या मैदानावर सामना होत असला तर त्याचा एक चांगला फायदा संघाला होत असतो. कारण त्या मैदानासंदर्भातील बऱ्यापैकी अभ्यास संघाचा झालेला असतो. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यात नुकतीच झालेली टी-२० सामन्यांची मालिका भारताने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना इंदूरमध्ये होणाऱ्या मालिका सामन्यातही भारतीय संघ बांग्लादेशचा पराभव करेल, असा विश्वास आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विराटने मैदान घरचे असो किंवा कोणतेही यश हे कामगिरीवरच मिळते, असे म्हटले आहे.


हेही वाचा – विराट रमलाय गल्ली क्रिकेटमध्ये!

- Advertisement -

बांगलादेशच्या गोलंदाजांची कामगिरी चांगली – विराट

‘कोणत्याही संघाला गृहित धरणे चुकीचे आहे. कोणताही संघ केव्हाही चांगली कामगिरी करु शकतो. टी-२० सामन्याची मालिका जरी आम्ही जंकली असली तरी बांगलादेशचे गोलंदाज सध्या चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे बांगलादेश संघाला गृहित धरता कामा नये’, असे विराट कोहली म्हणाला. यावेळी विराटने आपल्या संघाचे कौतुक केले. यात उमेश यादव आणि मोहम्मद शमीचे यांच्या योगदानाचे देखील त्याने कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -