घरक्रीडाकोहलीचा 'विराट' विक्रम, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित स्थान

कोहलीचा ‘विराट’ विक्रम, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित स्थान

Subscribe

विराट कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५० झेल घेणारा विराट हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना झाला. या सामन्यात भारताचा पहिला डाव १६५ डावांवर संपुष्टात आला. कर्णधार विराट कोहलीने हेन्री निकोल्सच्या फलंदाजीचा स्लीपमध्ये झेल घेतला. यासह नव्या विक्रमाला गवसणी घातली. विशेष म्हणजे हा पराक्रम करणारा विराट कोहली चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने अझरूद्दिन-द्रविड आणि सचिन अशा दिग्गज भारतीय खेळाडूंच्या पंक्तित स्थान मिळवले आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्याच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरविला आणि पहिल्या सत्रात पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांची विकेट्स घेतली. मात्र विराट कोहलीने द्विशतकाला गवसणी घातली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५० झेल घेणारा विराट हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी राहुल द्रविडने २६१ झेल, मोहम्मद अझरूद्दीन २६१ झेल आणि सचिन तेंडुलकरने २५६ झेल घेतले आहेत.

भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजांसमोर झाले फेल

पहिल्या दिवशी पाच विकेट गमावल्यानंतर १२२ धावा करणारा भारतीय संघ दुसर्‍याच दिवशी पहिल्या सत्रातच बाद झाला. रहाणे व पंत यांनी डावा पुढे नेणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या करता आली नाही. पंत बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या आर.अश्विनला शून्य धावसंख्येतच टीम साऊथीने बोल्ड केले. अश्विननंतर रहाणेही टीम साऊथीचा बळी ठरला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -