घरक्रीडासचिनचा शंभर शतकांचा विक्रम कोहली मोडू शकतो!

सचिनचा शंभर शतकांचा विक्रम कोहली मोडू शकतो!

Subscribe

कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके (कसोटीत २७ आणि वनडेत ४३) लगावली आहेत.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम विराट कोहली मोडू शकतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले. भारताचा सध्याचा कर्णधार कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके (कसोटीत २७ आणि वनडेत ४३) लगावली आहेत. दुसरीकडे सचिनने त्याच्या कारकिर्दीत कसोटीत ५१ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ अशी एकूण १०० शतके केली होती. कोहली खूप फिट असून अजून बरीच वर्षे क्रिकेट खेळेल. त्यामुळे त्याच्याकडे सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे, असे ब्रॅड हॉगला वाटते.

आताचे क्रिकेटपटू अधिक फिट 

सचिनचा १०० शतकांचा विक्रम कोहली नक्कीच मोडू शकतो. आताच्या काळातील क्रिकेटपटू हे सचिनच्या काळातील क्रिकेटपटूंपेक्षा अधिक फिट आहेत. तसेच आता चांगले फिटनेस ट्रेनर लवकर उपलब्ध होतात. आताच्या खेळाडूंना डॉक्टर्स आणि फिजिओ यांचीही खूप मदत होते. त्यामुळे खेळाडूंना फारशा दुखापती होत नाहीत आणि त्यांना फारशा सामन्यांना मुकावे लागत नाही. आता सामन्यांची संख्याही वाढली आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असता सचिनचा विक्रम मोडण्याची कोहलीला नक्कीच संधी आहे, असे हॉग म्हणाला.

- Advertisement -

भारताच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी

ब्रॅड हॉगने भारताच्या गोलंदाजांचे कौतुक केले. नोव्हेंबर २०१८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून बोलायचे तर भारताच्या गोलंदाजांनी जगभरात चांगली कामगिरी केली आहे. भारताचे वेगवान गोलंदाज इतर देशांच्या गोलंदाजांच्या तुलनेत कमी वेळात अधिक विकेट घेतात. त्यांनी हे यश ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांसारख्या उत्तम संघांविरुद्ध मिळवले आहे, असेही हॉग म्हणाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -