घरक्रीडाविराटने रचला इतिहास, वर्षात मिळवले तीन मानाचे पुरस्कार

विराटने रचला इतिहास, वर्षात मिळवले तीन मानाचे पुरस्कार

Subscribe

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आयसीसीमध्ये त्याने तीन पुरस्कार आपल्या नावावर केले.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली प्रगती करत आहे. विराट कोहलीने २०१८ सालच्या आयीसीसी पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार, सर्वोत्तम वन-डे-क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे मानाचे तीन पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत. विराटने २०१८ सालात वन-डे क्रिकेटमध्ये १३३.५५ च्या सरासरीने १ हजार २०२ धावा काढल्या आहेत. यामध्ये सहा शतकं आणि ३ अर्धशतकांचाही समावेश आहे.

- Advertisement -

१० हजार धावांचा विक्रम

कोहलीने २०१८ वर्षात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रमही कोहलीने आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी आणि एक दिवसीय मालिकेमध्ये भारताला विजय मिळवून देण्यातही विराट यशस्वी ठरला आहे. आयसीसीच्या कसोटी आणि एक दिवसीय संघाचंही विराट कोहलीने कर्णधारपद मिळवलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -