घरक्रीडाविक्रमी विराट करणार पॉन्टिंगशी बरोबरी?

विक्रमी विराट करणार पॉन्टिंगशी बरोबरी?

Subscribe

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच अनोखा विक्रम केला. वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान तो एका दशकात २० हजार धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. आता गुरुवारपासून सुरु होणार्‍या विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पॉन्टिंगशी बरोबरी करण्याची संधी आहे.

विराटने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत १८ शतके लगावली आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू पॉन्टिंगने कर्णधार असताना १९ कसोटी शतके झळकावली होती. त्यामुळे विराटने पहिल्या कसोटीत शतक केल्यास कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणार्‍यांच्या यादीत तो पॉन्टिंगशी बरोबर करेल. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या नावे आहे. त्याने १०९ कसोटी सामन्यांत २५ शतके लगावली होती. यापैकी १७ शतके त्याने परदेशात केली होती. कोहलीने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २५ शतके झळकावली आहेत, ज्यात ६ द्विशतकांचा समावेश आहे.

- Advertisement -

तसेच भारताने हा सामना जिंकल्यास विराट माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी बरोबरी करेल. धोनीच्या नेतृत्वात भारताने विक्रमी २७ कसोटी सामने जिंकले होते, तर विराट कर्णधार असताना भारताने आतापर्यंत २६ कसोटी सामने जिंकले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -