Video – बिग बॉस!! अनुष्काने थांब म्हटल्यावर विराटने थांबवला इंटरव्ह्यू!

इंस्टाग्रामवर इंग्लंडचा माजी कॅप्टन केविन पीटरसनने इंटरनॅशनल क्रिकेट प्लेयर्स इंस्टाग्रामवर लाईव्ह इंटरव्ह्यू करत होता.

Mumbai
virat kohli and anushka sharma
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अनुष्का

भारतात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे सध्या भारताचा क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली आपली बायको बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर घरीच वेळ घालवत आहे. ते दोघही सोशल मीडियावर खूप अक्टिव्ह असतात. ते दोघेही एकमेकांबरोबरचे व्हीडिओ, फोटो शेअर करत असतात. सध्या कोरोना व्हायरसमुळे सगळ्या मॅचेस आणि आयपीएल स्थगित केल्या आहेत. त्यामुळे सगळेच खेळाडू घरी वेळ घालवत आहेत.

@patel_akash___Chalo chaloo dinner time😂😂##viratkohli ##cricket ##cricketlover

♬ original sound – _Akash__patel

इंस्टाग्रामवर इंग्लंडचा माजी कॅप्टन केविन पीटरसनने इंटरनॅशनल क्रिकेट प्लेयर्स इंस्टाग्रामवर लाईव्ह इंटरव्ह्यू करत होता. हा इंटरव्ह्यू सगळ्यांनाच खूप आवडला. यात विराट कोहली देखील होता. या इंटरव्ह्यूमध्ये विराट कोहलीने देखील अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मात्र विराटची बायको अनुष्काच्या एका कमेंटममुळे तो इंटरव्ह्यू थांबला. मात्र अनुष्काच्या या कमेंटवर केविन पीटरसनने एक धम्माल प्रतिक्रीया दिली.

विराट कोहली आणि पीटरसनची चर्चा सुरू होती. यावेळी अनुष्काने ‘’चलो चलो डिनर टाईम….’’ ही कमेंट केली. यावेळी पीटरसन म्हणाला, चलो डिनर टाईम असं म्हणतेय आता शेवटचा प्रश्न विचारून मी माझा इंटरव्ह्यू संपवतो असं म्हणाला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.