घरक्रीडाविराट कोहली, मीराबाई चानू खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

विराट कोहली, मीराबाई चानू खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानूचा आज खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मान झाला.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोहली आणि चानू यांना पुरस्कार मिळाला.

- Advertisement -

  • विराट कोहली आणि मीराबाई चानू यांच्या मागील चार वर्षातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. दरवर्षी २९ ऑगस्ट म्हणजे क्रीडा दिनी होणारा हा पुरस्कार वितरण सोहळा एशियाड स्पर्धेमुळे यावर्षी २५ सप्टेंबरला पार पडला.
  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मागील ३-४ वर्षात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. तो सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. २०१७ मध्ये मीराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत विश्‍वविक्रम केला होता. तिने ४८ किलो वजनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
  • खेलरत्न पुरस्काराप्रमाणेच अर्जुन पुरस्काराचेही वितरण झाले. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये धावपटू हिमा दास, महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्यासह २० खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -