दुखापतीमुळे कोहली इंग्लिश काउंटी स्पर्धेबाहेर 

virat kohli
फोटो सौजन्य - एनडीटीव्ही स्पोर्टस

१५ जूनला होणार आरोग्य चाचणी

भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली इंग्लिश काउंटी स्पर्धेतील सर्री या टीमकडून खेळणार होता. मात्र रॉयल चॅलेंन्जर्स बँगलोर कडून खेळताना झालेल्या दुखापतीमुळे कोहली या स्पर्धेला हुकणार आहे. अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन जाहिर केली आहे.


 

विराटवर १५ जून रोजी बँगलोर येथील चिन्नास्वामी मैदानातील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत आरोग्य चाचणी होणार असून त्याची तब्येत इंग्लड दौऱ्यापर्यंत नीट होईल. अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वैद्यकीय टीमने दिली आहे. विराट इंग्लिश काउंटी स्पर्धेतील सर्री या टीमकडून खेळणार होता. त्याने तसा करार देखील केला होता. कोहली इंग्लिश काउंटी स्पर्धेसोबतच १४ जूनला बँगलोरमध्ये होणाऱ्या अफगाणिस्तान सोबतच्या टेस्टला देखील हुकणार आहे.

दुखापतीचे कारण काय ?

१७ मे रोजी झालेल्या रॉयल चॅलेंन्जर्स बॅंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या ५१व्या मॅच दरम्यान फिल्डींग करताना विराटला मानेची दुखापत झाली होती. ज्यामुळे विराट इंग्लिश काउंटी स्पर्धेबाहेर राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here