घरक्रीडाप्रत्येक खेळाडूने योग्य जबाबदारी पार पाडणे अपेक्षित - विराट कोहली

प्रत्येक खेळाडूने योग्य जबाबदारी पार पाडणे अपेक्षित – विराट कोहली

Subscribe

भारतीय क्रिकेट संघ आज ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियाला जाण्याअगोदर क्रिकेट संघाने पत्रकार परिषद बोलावली होती. या दौऱ्यात आपण जिंकूणच येऊ, अशी ग्वाही कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघ आज ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना झाला आहे. या दौऱ्याला जाण्याअगोदर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण जिंकूणच मायदेशी परत येऊ, असे विराट कोहली म्हणाला आहे. त्याचबरोबर या दौऱ्यात जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडूने आपापल्या वैयक्तीक पातळीवर मेहनत करणे गरजेचे असल्याचे कोहली म्हणाला.

हेही वाचा – विराट कोहलीकडून ‘या’ गोष्टी शिकाच..

- Advertisement -

नेमकं काय म्हणाला विराट कोहली?

विराट कोहली म्हणाला की, आमच्या संघाने भरपूर प्रगती केली आहे. पंरतु, अजूनही आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कुठल्या ठिकाणी आणि कशाप्रकारे सुधारणा व्हावी, याची कल्पना पूर्ण संघाला आली आहे. आपला संघ जिंकावा यासाठी प्रत्येक खेळाडूने वैयक्तीक पातळीवर मेहनत घेऊन जबाबदारी बाळगायला हवी. संघाने जिंकण्यासाठी योग्य असे नियोजन केले आहे, त्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक खेळाडूने मेहनत केल्यास आम्ही नक्कीच जिंकूण येऊ, असेही कोहली म्हणाला आहे.

हेही वाचा – मांसाहार सोडल्यामुळे खेळात झाली सुधारणा – विराट कोहली

- Advertisement -

जिंकण्यासाठी खेळाडू सज्ज – विराट कोहली

विराट कोहलीने सांगितले की, आम्ही आता जिंकण्यासाठी सज्ज झाले आहोत. शिवाय, सध्या आमच्याकडे गोलंदाज आक्रमक आहेत. त्यामुळे आता फलंदाजांवरही मोठी जबाबदारी आहे. आता प्रत्येकजण चांगले प्रदर्शन करण्याचा आणि चुका सुधारण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे विराट कोहली म्हणाला.


हेही वाचा – विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००० धावा करणारा फलंदाज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -