आज भारताची लढत न्यूझीलंड संघाशी होणार आहे. विश्वचषकात या दोन्ही संघांचा अजूनही पराभव झालेला नाही. आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला उत्तम संघाचा दर्जा मिळणार आहे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नव्या विक्रमापासून ५७ धावा दूर आहे. न्यूझीलंडच्या विरोधात विराटने ५७ धावा केल्या तर सचिन तेंडुलकरचा विक्रम तो मोडीत काढू शकतो. एकदिवसीय सामन्यात सर्वप्रथम ११ हजार धावा केल्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने २७६ सामन्यांत ११ हजार धावांचा पल्ला गाठला होता. विराट कोहलीने २२१ सामन्यांत ११ हजार ९४३ धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने या सामन्यात ५७ धावा केल्या तर, जगात सर्वात लवकर ११ हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला जाईल. एकदिवसीय सामन्यात ११ हजार धावा पूर्ण करणारा विराट भारताचा तिसरा फलंदाज ठरणार आहे. तसेच जगातला ९ वा खेळाडू ठरणार आहे. भारताकडून आतापर्यंत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
११ हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची यादी
१) सचिन तेंडुलकर (२७६ सामने, भारत)
२) रिकी पॉन्टिंग (२८६ सामने, ऑस्ट्रेलिया)
३) सौरव गांगुली (२८८ सामने, भारत)
४) जॅक कॅलिस (२९३ सामने, दक्षिण अफ्रिका)
५) कुमार संगकारा (३१८ सामने, श्रीलंका)
६) इंझमाम उल हक (३२४ सामने, पाकिस्तान)
७) जयसूर्या (३५४ सामने, श्रीलंका)
८) महेला जयवर्धने (३६८ सामने, श्रीलंका)