IPL 2020 : बंगळुरूचा चेन्नईवर ‘सुपर’ विजय; विराटचे अर्धशतक सत्कारणी

कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ९० धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंज बंगळुरू (आरसीबी)ने आयपीएलच्या सामान्यात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ३७ धावांनी पराभव केला. हा आरसीबीचा सहा सामन्यात चौथा विजय ठरला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना चार बाद १६९ धावा केल्या. याचा पाठलाग करताना चेन्नईला २० शतकांमध्ये ८ बाद १३२ धावाच करता आल्या. चेन्नईच्या संघाला यंदाच्या आयपीएल मौसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले असून त्यांचा हा सातव्या सामन्यात पाचवा पराभव ठरला. त्यामुळे चेन्नईचा संघ अवघ्या चार गुणांसह गुण तक्त्यात सहाव्या स्थानावर आहे.

कर्णधार विराट कोहलीने केलेल्या अर्धशतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६९ अशी धावसंख्या उभारली. कोहलीने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ९० धावांची खेळी केली. हे त्याचे यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक ठरले. याआधी त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ७२ धावा केल्या होत्या. तर त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले (४३) हुकले होते. आजच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मात्र त्याने अप्रतिम फलंदाजी केली.

हेही वाचा –

Hathras Case : सीबीआय करणार हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी