घरक्रीडाविराटच्या फलंदाजीचे व्हिडीओ पाहून शिकतो- बाबर

विराटच्या फलंदाजीचे व्हिडीओ पाहून शिकतो- बाबर

Subscribe

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे व्हिडीओ पाहून फलंदाजीमध्ये सुधारणा करत असल्याचे पाकिस्तान संघातील आघाडीचा फलंदाज बाबर आझम याने सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘विराट कोहलीची फलंदाजी पाहत असतो. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तो आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतो हे खरच शिकण्यासारखे आहे. त्याचे हे कौशल्य अनुकरण करण्यासारखे आहे.’ असे बाबर म्हणाला. ‘अनुभवातून मी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.

माझे १०० टक्के संघाला देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. कोहलीचा संघाच्या विजयाप्रति असणारे योगदान अधिक आहे. त्याच्याप्रमाणेच मीही संघाला योगदान देऊ इच्छितो.’ असेही बाबर म्हणाला.तसेच ‘चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळालेल्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. तोच आत्मविश्वास या सामन्यांमध्ये आम्हाला विजयासाठी मदत करेल,असे त्याने सांगितले.

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघामध्ये रविवारी लढत होणार आहे. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. या सहाही सामन्यांत भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतासारख्या तगड्या इंग्लंडचा पाकिस्तान संघाने पराभव केला आहे. पण, त्यांना विंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरोधात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -