घरक्रीडाविराट, रोहित मोडू शकतात माझा विक्रम!

विराट, रोहित मोडू शकतात माझा विक्रम!

Subscribe

 ब्रायन लाराचे मत

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (नाबाद ३३५) पाकिस्तानविरुद्ध लाराचा विक्रम मोडणार असे वाटत असतानाच ऑस्ट्रेलियाने त्यांचा डाव घोषित केला. त्यामुळे लाराचा विक्रम अजूनही अबाधित आहे. मात्र, भविष्यात हा विक्रम नक्कीच मोडला जाईल असे लाराला वाटते. तसेच हा विक्रम कोण मोडू शकेल असे विचारले असता, त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचा सहकारी रोहित शर्माचे नाव घेतले.

आक्रमक शैलीत खेळणार्‍या फलंदाजांना माझा विक्रम मोडण्याची जास्त चांगली संधी आहे असे मला वाटते. विराट कोहली हा उत्कृष्ट खेळाडू असून तो खोर्‍याने धावा करतो. त्यामुळे त्याला किंवा रोहित शर्माला एक, दीड दिवस फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर ते ४०० धावांचा विक्रम नक्कीच मोडू शकतील. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, असे लारा म्हणाला.

- Advertisement -

वेस्ट इंडिजचे भविष्य उज्वल!

वेस्ट इंडिजने नुकतीच झालेली भारताविरुद्धची टी-२० मालिका १-२ अशी गमावली. मात्र, या मालिकेत विंडीजच्या खेळाडूंनी भारताला चांगली झुंज दिली. हे खेळाडू पुढील काळात स्वतःच्या खेळात सुधारणा करतील अशी ब्रायन लाराला आशा आहे. तसेच तो म्हणाला, वेस्ट इंडिजने टी-२० मालिकेत भारताला झुंज दिली. अखेरच्या सामन्यात भारताने उत्कृष्ट खेळ करत ही मालिका जिंकली. मात्र, वेस्ट इंडिजच्या संघात बरेच युवा, प्रतिभावान खेळाडू आहेत आणि १० महिन्यांनंतर इतर संघांना वेस्ट इंडिजला पराभूत करणे सोपे जाणार नाही. आम्ही सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकला. त्यामुळे आमच्याविरुद्ध जिंकण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळच करावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -