बाळ झालं तर ‘या’ गोष्टी सोडून देईल विराट…

anushka and virat
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

 

काही दिवसांपूर्वीच आपल्या घराचा कॅप्टन नक्की कोण? हे सांगणाऱ्या विराट कोहलीनं आपल्या कुटुंब आणि मुलांविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने मागील वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केलं. त्यानंतर प्रत्येक क्षणी त्याने अनुष्काच्या आपल्या आयुष्यात असलेल्या स्थानाविषयी सांगितलं आहे.

माझा सगळा वेळ मुलांसाठीच!

विराटनं ईएसपीएएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच भविष्यात आपल्या होणाऱ्या मुलांविषयी दिलखुलासपणे मतं मांडली. ‘माझा संपूर्ण वेळ हा माझ्या मुलांचा असून मी मिळवलेल्या यशाचं त्यांच्यावर कोणतंही दडपण येणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन’ असं विराट यावेळी म्हणाला. ‘मला माझं आयुष्य आहे. माझं कुटुंब आहे. माझा सर्व वेळ त्यांचा असायला हवा. माझ्या करिअरसंबंधित कोणतीही वस्तू मी नक्कीच घरात ठेऊन त्यांच्यावर दडपण येईल असे करणार नाही. त्यामुळे मला मिळालेल्या ट्रॉफीज मी घरात मुलं मोठी होत असताना नक्कीच ठेवणार नाही’, अशा शब्दांत बाबा झाल्यानंतर मुलांना कसं सांभाळणार याविषयी विराटने सांगितलं.

‘अनुष्का माझी ताकद’

‘अनुष्का माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली आणि तिने मला नेहमीच साथ दिली आहे. ती माझ्या आयुष्यात माझी ताकद असून ती नेहमीच योग्य निर्णय घेते आणि नेहमी मला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करते’, अशी भावनादेखील त्याने यावेळी व्यक्त केली.

अनुष्का अमेरिकेत तर विराट इंग्लंडमध्ये!

दरम्यान, अनुष्का सध्या ‘झिरो’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटिंमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं शुटिंग अमेरिकेत सुरू असून शाहरूख खानसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र, त्याचवेळी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएलमध्ये खराब कामगिरीमुळे आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे विराटही लवकरच इंग्लिश कौंटिसाठी इंग्लंडला रवाना होईल. मात्र, नेहमीप्रमाणे अनुष्का विराटला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here