घरक्रीडावॉर्नर हा विचारी क्रिकेटपटू! - स्लेटर

वॉर्नर हा विचारी क्रिकेटपटू! – स्लेटर

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. या विश्वचषकात मात्र तो संयमाने खेळताना दिसत आहे. परंतु, जर वातावरण आणि खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल, तर वॉर्नर पुन्हा त्याच्या आक्रमक शैलीमध्ये खेळताना दिसेल, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मायकल स्लेटर यांना वाटते.

ते म्हणाले, मला वाटत नाही की हा नवा, वेगळा डेविड वॉर्नर आहे. माझ्या मते तो आता पूर्वीपेक्षा जास्त विचारी खेळाडू झाला आहे. मात्र, त्यामुळे त्याचा फायदा होणार की नुकसान हे सांगणे अवघड आहे. तो सध्या परिस्थितीनुसार खेळत आहे. तो त्याला दिलेली भूमिका चोख पार पाडत आहे.

- Advertisement -

वॉर्नरने या विश्वचषकाच्या ५ सामन्यांत १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने २८१ धावा केल्या आहेत. विश्वचषकाआधी झालेल्या आयपीएलमध्ये वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच्या फॉर्मविषयी स्लेटर यांनी सांगितले, पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरने परिस्थितीनुसार संयमाने फलंदाजी केली, कारण दुसर्‍या बाजूने फिंच आक्रमक फलंदाजी करत होता. वॉर्नरने आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवली होती. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास परत येताच, आपल्याला पुन्हा जुना फटकेबाजी करणारा वॉर्नर पाहायला मिळेल याची मला खात्री आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -