घरक्रीडापश्चिम रेल्वेची मध्य रेल्वेवर मात

पश्चिम रेल्वेची मध्य रेल्वेवर मात

Subscribe

अमर हिंद मंडळ व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो

पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेचा पराभव करत अमर हिंद मंडळ व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तसेच, या स्पर्धेचे तिसरे स्थान मुंबई महानगरपालिका आणि महावितरण संघाला मिळाले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेवर १८-१२ अशी ६ गुणांनी मात केली. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. त्यामुळे मध्यंतराला पश्चिम रेल्वेकडे ८-६ अशी अवघ्या २ गुणांची आघाडी होती. मात्र, मध्यंतरानंतर हा सामना एकतर्फी झाला. पश्चिम रेल्वेच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. त्यामुळे त्यांनी हा सामना १८-१२ असा मोठ्या फरकाने जिंकला. पश्चिम रेल्वेकडून प्रसाद राडीये (१:३०, १:०० मि. संरक्षण), अमित पाटील (२:४०, १:५० मि. संरक्षण), अमोल जाधव (३:२०, १:०० मि. संरक्षण आणि १ बळी), राहुल उईके (१:३० मि. संरक्षण आणि ५ गडी) यांनी चमकदार खेळ केला. मध्य रेल्वेच्या चावरेकरने (२:०० मि. संरक्षण आणि २ बळी) चांगला खेळ केला. पण, त्याला आपल्या संघाला सामना जिंकून देता आले नाही.

सर्वोत्तम संरक्षक – अमोल जाधव (पश्चिम रेल्वे)
सर्वोत्तम आक्रमक मिलिंद चावरेकर (मध्य रेल्वे)
सर्वोत्तम अष्टपैलू – अमित पाटील (पश्चिम रेल्वे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -