घरक्रीडाराष्ट्रीय क्रिकेट अकादमी उपचारांची काय हमी ?

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी उपचारांची काय हमी ?

Subscribe

भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीनंतर इतर खेळाडूंचा उपचारांसाठी नकार

रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे.परंतु,पहिल्याच सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घेतली आहे. उजव्या मांडीचे स्नायू अचानक दुखू लागल्याने त्याने ही माघार घेतल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) शनिवारी जाहीर केले.भुवनेश्वर कुमारला दिवसांपूर्वीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधून फिट असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.

पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत केवळ तीन सामने खेळल्यानंतर त्याच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले. यामुळेच अकादमी आणि येथील तज्ञ लोकांच्या कामावर व योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच प्रकारामुळे आता हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होण्यासाठी अकादमीमध्ये जाण्यास नकार देत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

- Advertisement -

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वानखेडेवर खेळवण्यात आलेल्या तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यात भुवीने उजव्या मांडीचे स्नायू दुखावल्याचे कळवले होते. डॉक्टरांनाही त्याच्या दुखापतीचे निदान करता आले नाही. पण, सूत्रांच्या माहितीनुसार सामन्यानंतर भुवी त्वरित वैद्यकीय मदतीसाठी धावला आणि त्यातून त्याची ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आले.

त्याच्या जागी संघात बदली खेळाडू म्हणून शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. या मालिकेत भारताला शिखर धवननंतर आता भुवनेश्वरच्या रुपाने हा दुसरा धक्का बसला आहे. त्याने नुकतेच दुखापतीतून सावरत टीम इंडियात पुनरागमन केले होते आणि आता पुन्हा त्याच्या दुखापतीने डोके वर काढले आहे.भुवनेश्वरवर दुखापतीवर आता शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यातून सावरण्यासाठी त्याला किमान दोन महिने विश्रांती करावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -