बीसीसीआयने पाकिस्तानबाबत काय तो निर्णय घ्यावा

Mumbai
रायडूला वगळल्याबद्दल गंभीरचा सवाल

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्यानंतर म्हणाला होता की भारताने पाकिस्तानशी क्रिकेटच नाही तर कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता कामा नये. आता गंभीर बीसीसीआयने पाकिस्तानसोबत खेळायचे की नाही याबाबत काय तो निर्णय घ्यायला हवा आणि त्याच्या परिणामांसाठी तयार रहावे असे म्हणाला आहे.

तुम्ही पाकिस्तानवर सशर्त बंदी घालू शकत नाही. एकतर तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घाला किंवा अजिबातच बंदी घालू नका. पुलवामामध्ये जे झाले ते अतिशय चुकीचे होते. मला खात्री आहे की आयसीसीच्या स्पर्धांमध्ये त्यांच्याविरोधात खेळायला नकार देणे अवघड असेल. पण, आशिया कपमध्ये तुम्ही त्यांच्याविरुद्ध सामना खेळायला नकार देऊ शकता, असे गंभीर म्हणाला.

तसेच बंदी घालण्याविषयी बोलताना गंभीरने इंग्लंडचे उदाहरण दिले. इंग्लंडने २००३ विश्वचषकात रॉबर्ट मुगाबे यांच्या शासनाला विरोध दर्शवण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा राऊंड-रॉबिन सामना खेळण्यास नकार दिला होता. याबाबत गंभीर म्हणाला, इंग्लंडने २००३ मध्ये ठरवले होते की आम्ही झिम्बाब्वेला जाणार नाही आणि त्यांनी सामना खेळायला नकार दिला. जर बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला, तर सर्वांनी ते २ गुण आपल्याला मिळणार नाहीत यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहिले पाहिजे. याचा काही काहीतरी परिणाम होईलच. कदाचित भारत उपांत्य फेरीमध्येही जाणार नाही. पण, असे झाले तर मीडियाने बीसीसीआयवर टीका करता कामा नये. दोन गुण इतके काही महत्त्वाचे नाहीत. माझ्यासाठी देशाचा जे ४० जवान शहीद झाले ते कोणत्याही क्रिकेट सामन्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. मी देशाला प्राधान्य देतो. त्यामुळे जर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला, तर देशवासीयांनी त्यासाठी तयार असायला हवे, असे गंभीरने सांगितले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकाचा सामना १६ जूनला होणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हा सामना खेळू नये अशी मागणी होत आहे. ही मागणी करणार्‍यांमध्ये हरभजन सिंग, सौरव गांगुली यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्या मते भारताने पाकिस्तानला उगाचच २ गुण बहाल करू नये आणि त्यासाठी हा सामना खेळावा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here