धोनी हैद्राबाद सोबत का नाही खेळला?

बुधवारी हैद्राबाद सोबत झालेल्या सामन्यामध्ये महेद्र सिंह धोनी खेळताना दिसला नव्हता. त्यामुळे धोनी का खेळत नाही? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता.

Hyderabad
why mahendra singh dhoni not play with Hyderabad
धोनी हैद्राबाद सोबत का नाही खेळला?

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या १२ व्या मोसमात चेन्नई उत्कृष्ठ कामगिरी करत आहे. या मोसमात चेन्नईने एकूण नऊ सामने खेळले आहेत. या नऊ सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये चेन्नईला यश आले आहे. एक सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला आहे. तर बुधवारी झालेल्या सामन्यात हैद्राबादने चेन्नईचा पराभव केला आहे. मात्र, धोनीची कमतरता हा सामना बघताना जाणवत होती. त्यामुळे धोनी का खेळत नाही? असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात येत होता.

रैनाने दिले स्पष्टीकरण?

बुधवारी हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने विश्रांती घेतली होती. धोनीच्या जागेवर सॅम बिलिंग खेळत होता. त्यामुळे बऱ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. शिवाय, अजूनही काही चाहत्यांना ठाऊक नाही की धोनी सामना का नाही खेळला? याबाबत बुधवारी नाणेफेक झाल्यानंतर सुरेश रैनाने स्पष्टीकर दिले होते. सुरेश रैनाने सांगितले होते की, ‘धोनीला सध्या आरामाची निंतात गरज आहे. पुढच्या सामन्यात मात्र धोनी खेळणार आहे. धोनीच्या ऐवजी करण शर्माला संघात घेतले गेले आहे आणि सॅम बिलिंग धोनीच्या यष्टीरक्षण करणार आहे’

काय आहे नेमंक कारण?

दोन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल विरोधात खेळताना धोनीच्या पाठीत चमक भरली होती. त्यामुळे धोनीला बसायला देखील जमत नव्हते. डॉक्टरांनी धोनीला विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे हैद्राबाद समोर खेळताना धोनी मैदानावर दिसला नाही.