Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा राष्ट्रगीताच्या वेळी का रडला सिराज? मोहम्मद कैफ, जाफरने केलं मोठं विधान

राष्ट्रगीताच्या वेळी का रडला सिराज? मोहम्मद कैफ, जाफरने केलं मोठं विधान

Related Story

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या तीसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवार पासून सुरुवात झाली. यावेळी पहिल्या दिवशी राष्ट्रगीताच्या वेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर माजी क्रिकेटपटू वासिम जाफर आणि मोहम्मद कैफ यांनी प्रतिक्रिया देताना सिराजची प्रशंसा केली आहे. मोहम्मद सिराजने पहिला दिवस संपल्यानंतर का रडला त्यामागिल कारण सांगितलं.

भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर आणि माजी फलंदाज मोहम्मद कैफ यांनी सिराजची प्रशंसा केली आहे. वसीम जाफर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ट्विट केलं की, “मैदानावर प्रेक्षक असोत किंवा प्रेक्षक कमी असले तरी भारताकडून खेळण्यापेक्षा मोठी प्रेरणा कोणतीच असू शकत नाही. एक महान खेळाडू म्हणाला की, तुम्ही प्रेक्षकांसाठी नाही तर देशासाठी खेळता.” त्याच वेळी मोहम्मद कैफने ट्विट करत लिहिलं की, “काही लोकांना हा फोटो लक्षात ठेवावा अशी माझी इच्छा आहे. हा मोहम्मद सिराज आहे आणि त्याच्यासाठी हा राष्ट्रगीताचा अर्थ आहे.” असं ट्विट मोहम्मद कैफने केलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सिडनी कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघांचं राष्ट्रगीत झालं. दरम्यान, टीम इंडियाकडून दुसरा कसोटी सामना खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज राष्ट्रगीताच्यावेळी थोडा भावनिक दिसत होता. भारताच्या राष्ट्रगीताच्या वेळी मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले. सिराजचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, सिराजने राष्ट्रगीतावेळी अश्रू अनावर का झाले, याबद्दल सांगितलं. राष्ट्रगीता दरम्यान मला माझ्या वडिलांची आठवण आली म्हणूनच मी जरा भावूक झालो. मी कसोटी क्रिकेट खेळायला हवं, असं वडिलांना वाटत होतं. ते जीवंत असते तर मला खेळताना पाहिलं असतं, असं सिराज म्हणाला.

 

- Advertisement -