पंजाब प्ले-ऑफ गाठणार का?

किंग्स इलेव्हन पंजाबला यंदाच्या आयपीएल मोसमात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश येत होते. त्यांना सुरुवातीच्या सात सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकता आला होता. मात्र, त्यांनी गेल्या सलग दोन सामन्यांत विजय मिळवले आहेत. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या बलाढ्य संघांना पराभूत केले. सुरुवातीचे सात सामने आणि मागील दोन सामने यातील पंजाबच्या खेळात फारच फरक होता. यामागील मुख्य कारण ठरले ते म्हणजे क्रिस गेलची संघात एंट्री. त्याच्या समावेशाने पंजाबचा संघ मजबूत झाला आहे. मात्र, हा संघ प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणार का? यावर केलेली चर्चा.