Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर IPL 2020 IND vs AUS : पुकोवस्कीला संधी; कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर    

IND vs AUS : पुकोवस्कीला संधी; कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर    

टीम पेन ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे.    

Related Story

- Advertisement -

विल पुकोवस्की आणि कॅमरुन ग्रीन यांच्यासह पाच नवोदित खेळाडूंची भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा झाली. या संघात फलंदाज विल पुकोवस्की, अष्टपैलू कॅमरुन ग्रीन, सीन अ‍ॅबट, मायकल निसर आणि लेगस्पिनर मिचेल स्वॅपसन या नवोदित खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

२२ वर्षीय पुकोवस्की सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियातील चार दिवसीय स्थानिक स्पर्धा शेफील्ड शिल्डमध्ये व्हिक्टोरिया संघाकडून सलामीवीर म्हणून खेळताना पुकोवस्कीने सलग दोन द्विशतके झळकावली. त्याने दोन सामन्यांत तब्बल २४७.५० च्या सरासरीने ४९५ धावा केल्या आहेत. त्यामुळेच त्याला कसोटी संघात संधी मिळाली आहे. आता तोच डेविड वॉर्नरच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे टीम पेन नेतृत्व करणार असून पॅट कमिन्स उपकर्णधार असेल.


- Advertisement -

ऑस्ट्रेलिया कसोटी संघ : टीम पेन (कर्णधार), सीन अ‍ॅबट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रीन, जॉश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लबूशेन, नेथन लायन, मायकल निसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वॅपसन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर 


 

- Advertisement -