घरक्रीडाविल्यमसन न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज

विल्यमसन न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज

Subscribe

क्रिकेट विश्वचषकात बुधवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ अडचणीत असताना कर्णधार केन विल्यमसनने १३८ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात ८ धावांची गरज असताना विल्यमसनने एक षटकार आणि एक चौकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

या त्याच्या खेळीमुळे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वोत्त्कृष्ट फलंदाज आहे, असे न्यूझीलंडचा महान फिरकीपटू डॅनियल व्हिट्टोरी म्हणाला.

- Advertisement -

केन विल्यमसन हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वोत्त्कृष्ट फलंदाज आहे आणि त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे पुन्हा एकदा सिद्ध केले. तो आताच खूप उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याची कारकीर्द संपेल तेव्हा त्याची कामगिरी ही न्यूझीलंडच्या यापूर्वीच्या किंवा आताच्या फलंदाजांपेक्षा श्रेष्ठ असेल. त्याने इतक्या कमी काळातच खूप यश मिळवले आहे, मग ते कर्णधार म्हणून असो की फलंदाज म्हणून.

तो मैदानाच्या कोणत्याही कोपर्‍यात फटके मारू शकतो. तो सतत १-२ धावा काढून गोलंदाजांना अडचणीत टाकतो. तसेच तो फक्त आपल्या संघाला सामना जिंकवून देण्यासाठी खेळतो, हेच त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळे बनवते, असे व्हिट्टोरी म्हणाला.

- Advertisement -

विल्यमसनने आतापर्यंत १४३ एकदिवसीय सामन्यांत ४७.३६ च्या सरासरीने ५७७९ धावा केल्या असून न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या स्थानी आहे. या यादीत अव्वल स्थानी विल्यमसनचा सहकारी रॉस टेलर आहे. त्याने २२२ एकदिवसीय सामन्यांत ८१५७ धावा केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -