सामना न जिंकणे निराशाजनक !

Mumbai
rohit sharma
रोहित शर्माचे विधान

सामना न जिंकणे निराशाजनक होते, पण आम्ही शेवटपर्यंत झुंज दिली, असे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या टी-२० सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. भारताचा या सामन्यात ४ धावांनी पराभव झाला. या मालिकेआधी भारताने एकदिवसीय मालिका जिंकली होती. त्याआधी ऑस्ट्रेलियामध्ये भारताने ऐतिहासिक कामिगरी केली होती.

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी आणि द्विदेशीय एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता, मात्र न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकत दौर्‍याचा शेवट गोड करण्यात भारताला अपयश आले.

हा सामना न जिंकता येणे हे खूप निराशाजनक आहे. २१३ धावांचे आव्हान पार करणे कठीणच जाणार होते, पण आम्ही शेवटपर्यंत झुंज दिली. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. त्यांनी शेवटच्या काही षटकांत चांगले यॉर्कर टाकले.

आम्ही ही मालिका गमावली असली तरी आमच्यासाठी या दौर्‍यात खूप सकारात्मक गोष्टी घडल्या. आम्ही एकदिवसीय मालिका जिंकत दौर्‍याची सुरुवात चांगली केली. आम्ही या दौर्‍यात खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे टी-२० मालिका न जिंकल्याचे आम्हाला दुःख आहे, असे रोहित म्हणाला.