घरक्रीडारविंद्र जाडेजा २१ व्या शतकातील भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू!

रविंद्र जाडेजा २१ व्या शतकातील भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू!

Subscribe

विस्डेनने कसोटी क्रिकेटमध्ये २१ व्या शतकातील भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून जाडेजाची निवड केली आहे.

भारताचा डावखुरा अष्टपैलू रविंद्र जाडेजाला बहुमान मिळाला आहे. विस्डेनने कसोटी क्रिकेटमध्ये २१ व्या शतकातील भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून जाडेजाची निवड केली आहे. प्रत्येक संघाचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (सर्वात महत्त्वाचा खेळाडू) निवडताना त्यांना त्यांच्या कामगिरीनुसार गुण देण्यात आले. जाडेजाला ९७.३ गुण मिळाले. जागतिक क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्यानंतर जाडेजा सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू ठरला.

माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट

भारतासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते. त्यातच सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून निवड होणे ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. चाहते, संघातील सहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांनी नेहमीच मला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. मी त्यांचे खूप आभार मानतो, असे जाडेजा म्हणाला. २०१२ मध्ये पदार्पण करणाऱ्या जाडेजाने आतापर्यंत भारतासाठी ४९ कसोटी सामने खेळले असून यात १८६९ धावा केल्या आहेत आणि २१३ विकेट घेतल्या आहेत.

- Advertisement -

जाडेजाचे योगदान खूप मोठे

क्रिकविझ या कंपनीने पुरविलेल्या आकड्यांनुसार सर्व खेळाडूंना गुण देण्यात आले. क्रिकविझचे फ्रेडी विल्डे जाडेजाबाबत म्हणाले की, कसोटीत भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून जाडेजाची निवड झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले असेल. बरेचदा त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळत नाही. परंतु, तो जेव्हा खेळतो, तेव्हा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तो प्रमुख गोलंदाज म्हणून खेळतो आणि कधीतरी सहाव्या क्रमांकावरही फलंदाजी करतो. त्यामुळे त्याचे योगदान खूप मोठे असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -