घरक्रीडाभारतीय महिला क्रिकेटचे माजी कोच आणि खेळाडूंतील वाद कायम

भारतीय महिला क्रिकेटचे माजी कोच आणि खेळाडूंतील वाद कायम

Subscribe

महिला टी - २० विश्वचषक अवघ्या ५ महिन्यांवर येऊन ठेपला असताना प्रशिक्षकाने राजीनामा दिल्यामुळे भारतीय महिला क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघांचे माजी प्रशिक्षक तुषार आरोटे यांनी काही दिवंसापूर्वी राजीनामा दिला. मात्र अद्यापही माजी प्रशिक्षक आणि महिला क्रिकेटर्समधील वाद संपला नाहीये. महिला टी-२० विश्वचषक अवघ्या ५ महिन्यांवर येऊन ठेपला असताना प्रशिक्षकाने राजीनामा दिल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये खळबळ उडाली आहे.


भारतीय महिला संघातील खेळाडू आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत नाहीत, तसेच आपल्या सरावावरही त्या लक्ष देत नाहीत, अशी टीका महिला क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक तुषार आरोटे यांनी केली आहे. तसेच आरोटेंच्या राजीनामा देण्यामागे काही वैयक्तिक कारणे देखील आहेत. काही भारतीय खेळाडूंशी तणावपूर्ण संबंधांमुळेही त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बैठकीदरम्यान आरोटेंनी आपला राजीनामा दिला होता. एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधार मिथाली राज, भारताची टी-२० सामन्यांची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि महिला क्रिकेट समितीच्या अध्यक्षा हेमलता कला या बैठकीस उपस्थित होत्या.

काय आहे आरोटेंचे विधान

महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “आपण खेळाडूंना हवी ती सरावपद्धत वापरू शकत नाही, तसेच जर त्यांना काही साध्य करायचे आहे तर त्यांना आपल्या आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला हवे”

- Advertisement -

याआधीही कोचने दिला होता असाच राजीनामा

भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनीही मागच्या वर्षी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून राजीनामा दिला होता. महिला खेळाडूंच्या सराव करण्याच्या पद्धतींमुळेच कुंबळेनीही राजीनामा दिला होता.

kumble-
अनिल कुंबळे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -