घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही.सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. सिंधूला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. बुधवारी झालेल्या दुसर्‍या फेरीतील सामन्यात तिने तैवानच्या पाई यु-पो हिचा २१-१४, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना जिंकण्यासाठी जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणार्‍या सिंधूला केवळ ४२ मिनिटे लागली.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे पहिल्या गेमच्या मध्यंतराला तिने ११-७ अशी आघाडी मिळवली. तिने दमदार खेळ सुरु ठेवत सिंधूने १७-१० अशी मोठी आघाडी घेतली. अखेर तिने पहिला गेम २१-१४ असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये सिंधूने चांगला खेळ सुरूच ठेवत सुरुवातीलाच ६-१ अशी मोठी आघाडी मिळवली. मात्र, यु-पोने दमदार पुनरागमन केले. तिने पुढील १४ पैकी १० गुण जिंकले आणि मध्यंतराला ११-१० अशी आघाडी मिळवली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर मात्र सिंधूने आपला खेळ उंचावला. त्यामुळे तिने १८-१३ अशी घेतली. यानंतर ५ पैकी ३ गुण मिळवले. त्यामुळे सिंधूने दुसरा गेम २१-१५ असा जिंकत आगेकूच केली. तिसर्‍या फेरीत तिचा अमेरिकेच्या बिवेन झेन्गशी सामना होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -