घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताच्या साई प्रणितने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत १६ व्या सीडेड प्रणितने सहाव्या सीडेड इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिंटिंगवर २१-१९, २१-१३ अशी सरळ गेममध्ये मात केली. पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत एच.एस.प्रणॉयला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्याला अव्वल सीडेड जपानच्या केंटो मोमोटाने २१-१९, २१-१२ असे पराभूत केले. मागील सामन्यात चीनचा महान खेळाडू लिन डॅनवर मात करणार्‍या प्रणॉयने मोमोटाला पहिल्या गेममध्ये चांगली झुंज दिली. दुसर्‍या गेममध्ये मात्र त्याने निराशाजनक खेळ केला. त्यामुळे मोमोटाने दुसरा गेम ९ गुणांच्या फरकाने जिंकला.

अँथनी सिनीसुका गिंटिंगविरुद्धच्या सामन्याची प्रणितने चांगली सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या गेमच्या मध्यंतराला त्याच्याकडे ११-८ अशी आघाडी होती. मात्र, मध्यंतरानंतर गिंटिंगने त्याच्या खेळात सुधारणा केली. त्याने आक्रमक खेळ करत पहिल्या गेममध्ये १३-१३ अशी बरोबरी केली आणि नंतर १७-१५ अशी आघाडी मिळवली. परंतु, प्रणितने पुनरागमन करत १९-१९ अशी बरोबरी केली. प्रणितनेच पुढील २ गुण मिळवत पहिला गेम २१-१९ असा जिंकला. दुसर्‍या गेमच्या सुरुवातीपासूनच प्रणितने वर्चस्व प्रस्थापित करत ४-० अशी आघाडी घेतली.

- Advertisement -

मात्र, त्याची ही आघाडी फारकाळ टिकली नाही. गिंटिंगने दमदार पुनरागमन केले आणि मध्यंतराला ११-८ अशी आघाडी मिळवली. मध्यंतरानंतर प्रणितने उत्कृष्ट खेळ केला. त्याने पुढील १३ पैकी १२ गुण मिळवले. त्यामुळे त्याला २०-१२ अशी आघाडी मिळाली. यानंतर त्याने अप्रतिम स्मॅश मारत हा गेम २१-१३ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -