घरक्रीडाजागतिक बॅडमिंटन स्पर्धा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताच्या एच.एस.प्रणॉय आणि साई प्रणित यांनी बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेची दमदार सुरुवात केली. प्रणितने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत ६६ व्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या जेसन अँथोनी हो-शुईचा २१-१७, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव केला. ३९ मिनिटे चाललेल्या या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. त्यामुळे पहिल्या गेममध्ये ५-५ अशी बरोबरी होती. मात्र, प्रणितने यानंतर आपला खेळ उंचावत पहिल्या गेमच्या मध्यंतराला ११-७ अशी आघाडी मिळवली.

मध्यंतरानंतरही त्याने आपला दमदार खेळ सुरु ठेवत पहिला गेम २१-१७ असा ४ गुणांच्या फरकाने जिंकला. दुसरा गेमही सुरुवातीला चुरशीचा झाला. या गेमच्या मध्यंतराला प्रणितकडे ११-९ अशी केवळ दोन गुणांची आघाडी होती, पण पुढे जेसनला चांगला खेळ करण्यात अपयश आले. त्यामुळे प्रणितने हा गेम २१-१६ असा जिंकत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

- Advertisement -

जागतिक क्रमवारीत ३० व्या स्थानावर असणार्‍या प्रणॉयने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत फिनलंडच्या एटू हायनोवर १७-२१, २१-१०, २१-११ अशी मात केली. रंगतदार झालेल्या पहिल्या गेममध्ये प्रणॉयने हायनोला झुंज दिली. मात्र, त्याला हा गेम जिंकता आला नाही. त्याने पहिला गेम १७-२१ असा गमावला. परंतु, दुसर्‍या आणि तिसर्‍या गेममध्ये प्रणॉयने उत्कृष्ट खेळ केला. त्याने हायनोला दुसर्‍या गेममध्ये १०, तर तिसर्‍या गेममध्ये केवळ ११ गुण मिळवू दिले. त्यामुळे त्याने हे गेम सहजरित्या जिंकत आगेकूच केली. दुसर्‍या फेरीत प्रणॉयसमोर चीनचा महान खेळाडू लिन डॅनचे आव्हान असू शकेल.

तसेच महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताची जोडी जक्कमपूडी मेघना-एस राम पुर्विशालाही विजय मिळवण्यात यश आले.

- Advertisement -

सायना, सिंधूचे सामने आज

भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांचे बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेतील सलामीचे सामने मंगळवारी होतील. या दोघींनाही पहिल्या फेरीत बाय मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -