ब्रिजेश यादव दुसर्‍या फेरीत

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा

Mumbai
ब्रिजेश यादव

भारताच्या ब्रिजेश यादवने (८१ किलो) रशियामध्ये होत असलेल्या पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सुरुवात केली. त्याने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पोलंडच्या मालेउझ गोईन्स्कीवर मात केली. ब्रिजेशने यावर्षी दमदार कामगिरी केली आहे. त्याला इंडिया ओपन आणि थायलंड ओपनमध्ये रौप्यपदक पटकावण्यात यश आले.

ब्रिजेशने जागतिक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गोईन्स्कीचा ५-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात ब्रिजेशने केलेल्या आक्रमक खेळामुळे गोईन्स्कीच्या डोक्याला दुखापत झाली. गोईन्स्कीने या सामन्याची चांगली सुरुवात केली होती. परंतु, त्यानंतर ब्रिजेशने अप्रतिम खेळ करत प्रतिस्पर्ध्याला सामन्यात पुनगरमन करण्याची संधी दिली नाही. या विजयामुळे ब्रिजेशने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत त्याचा तुर्कीच्या बायरम माल्कनशी सामना होईल.

भारताच्या अमित पंघाल (५२ किलो), कविंदर सिंग बिश्त (५७ किलो) आणि आशिष कुमार (७५ किलो) यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला. या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ८७ देशांमधील ४५० बॉक्सर्स सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत हे बॉक्सर्स पारंपरिक दहा ऐवजी आठ वजनी गटांमध्ये (५२, ५७, ६३, ६९, ७४, ८१, ९१, +९१ किलो) खेळतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here