घरक्रीडाडूसेनने सावरले दक्षिण आफ्रिकेला

डूसेनने सावरले दक्षिण आफ्रिकेला

Subscribe

न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या चांगल्या सुरुवातीनंतर रॅसी वॅन डर डूसेन केलेल्या नाबाद ६७ धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाच्या सामन्यात ४९ षटकांत ६ बाद २४१ अशी धावसंख्या उभारली. या सामन्यादरम्यान अनुभवी हाशिम आमलाने ८००० धावांचा टप्पा पार केला. तो हा टप्पा गाठणारा दुसरा सर्वात जलद (१७६ डाव) फलंदाज ठरला आहे.

या सामन्याच्या सुरुवातीला मैदानाची परिस्थिती खराब असल्यामुळे हा सामना ४९ षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. फॉर्मात असलेल्या क्विंटन डी कॉकला अवघ्या ५ धावांवर ट्रेंट बोल्टने माघारी पाठवले. यानंतर कर्णधार फॅफ डू प्लेसिस आणि हाशिम आमला यांनी दुसर्‍या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. मात्र, डू प्लेसिस २३ धावांवर बाद झाला. आमलाने मात्र संयमाने फलंदाजी करत ७५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

- Advertisement -

त्याला एडन मार्करमने चांगली साथ दिल्यामुळे द.आफ्रिकेच्या १०० धावा फलकावर लागल्या, पण आमलाला ५५ धावांवर सँटनरने बाद करत ही जोडी फोडली. मार्करमही ३८ धावा करून माघारी परतला. मात्र, रॅसी वॅन डर डूसेन आणि डेविड मिलर यांनी द.आफ्रिकेचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केल्यानंतर मिलरला (३६) फर्ग्युसनने बोल्टकरवी झेलबाद केले. पुढे डूसेनने एकाकी झुंज देत द.आफ्रिकेला २४१ धावांपर्यंत पोहोचवले. डूसेनने ६४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

दक्षिण आफ्रिका : ४९ षटकांत ६ बाद २४१ (रॅसी वॅन डर डूसेन नाबाद ६७, हाशिम आमला ५५, एडन मार्करम ३८; लोकी फर्ग्युसन ३/५९, कॉलिन डी ग्रँडहोम १/३३) वि. न्यूझीलंड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -