घरक्रीडातो सन्मान विल्यमसनचा

तो सन्मान विल्यमसनचा

Subscribe

विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकला न्यूझीलंडर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. स्टोक्सचा जन्म हा न्यूझीलंडचाच, परंतु तो इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर त्याला या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले.

पण, स्टोक्सने हा पुरस्कार न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनला द्यावा, अशी विनंती केली आहे. ‘न्यूझीलंडकडून दिल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याचा आनंद आहे. पण, मी या पुरस्कारासाठी माझ्यापेक्षा अनेक चांगली माणसे न्यूझीलंडमध्येच आहेत. ज्यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे मी या नामांकनातून माघार घेत आहे. ’ असे स्टोक्स म्हणाला आहे. त्याच्यासह न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यालाही या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे आणि स्टोक्सने हा पुरस्कार विल्यमसननलाच मिळावा, असे मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

न्यूझीलंड येथील ख्राईस्टचर्च येथे स्टोक्सचा जन्म, परंतु वयाच्या 12व्या वर्षापासून तो इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला होता. त्याने 98 चेंडूंत 84 धावांची महत्त्वाची खेळी केली होती. शिवाय त्याने सुपर ओव्हरमध्ये 8 धावाही केल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -