घरक्रीडाआपलेच पारडे जड,पण...

आपलेच पारडे जड,पण…

Subscribe

मँचेस्टर म्हणजे टेक्सटाईल्स असे म्हटले जायचे. अलिकडे मात्र मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी या दोन फुटबॉल क्लब्सने मँचेस्टरचे नाव दुमदुमत ठेवले आहे. ब्रिटनमध्ये फुटबॉलची क्रेझ जास्त. वर्ल्डकप स्पर्धेमुळे क्रिकेटचा बोलबाला आहे. ओल्ड ट्रॅफर्डच्या परिसरात क्रिकेटप्रेमींची गर्दी दिसते. त्यातही आशियाई ब्रिटीशांचा भरणा जास्त. लँकेशायर क्रिकेट कौंटीचे मुख्यालय ओल्ड ट्रॅफर्डवरच असून रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी 25 हजारांहून अधिक क्रिकेटरसिक गर्दी करतील. या सामन्याची तिकीटे चुटकीसरशी संपली असली तरी काळया बाजारात या तिकीटांना प्रचंड मागणी आहे. जगभरातून प्रेक्षक भारत-पाक लढतीसाठी मँचेस्टरमध्ये दाखल झाले आहेत.

इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत लँकेशायर – यॉर्कशायर यांच्यातील लढतीला ‘बॅटल ऑफ रोझेस’ असे म्हटले जाते. भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीतही कडवा संघर्ष, झुंज पाहायला मिळतो. लँकेशायर कौंटीकडून फारोख इंजिनियर, क्लाईव्ह लॉईड, वसीम अक्रम, सौरभ गांगुली, माईक आथरटन, अँडरसन, फ्लिंटॉफसारखे नामवंत खेळाडू खेळले. पूर्वीप्रमाणे कौंटी स्पर्धेत आता लँकेशायरचा दबदबा राहिलेला नाही. ओल्ड ट्रॅफर्डजवळ असलेल्या मँचेस्टर युनायटेडकडे क्रिडाप्रेमींचा ओढा जास्त.

- Advertisement -

वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकवर नेहमीच कुरघोडी केली आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्येच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकताना पाकिस्तानने भारतावर मोठा विजय संपादला होता. या स्पर्धेच्या कटु स्मृती विसरण्यासाठी कोहली व त्याचे सहकारी निश्चितच प्रयत्न करतील. सर्फराज अहमदच्या पाक संघातील खेळाडूंना हा विजय स्फूर्तिदाायक ठरेल. खास करून शतकवीर फकर झमानला ! झमान तसा सुदैवीच, जसप्रीत बुमराने त्याचा त्रिफळा उडवला होता. परंतु नोबॉलमुळे झमान बचावला. त्याच्या शतकामुळे पाकिस्तानचा विजय साकारला. याच स्पर्धेतील साखळी लढतीत मात्र भारताने पाकला नमवले होते. त्या पराभवाची परतफेड त्यांनी अंतिम फेरीत केली.

दोन वर्षांदरम्याान बरेच काही घडले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शानदार कामगिरी केली असून रँकिंगमध्येही अव्वल स्थानावर झोप घेेतली आहे. कर्णधार कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरू आहे. जसप्रीत बुमराच्या वेगवान गोलंदाजीपुढे फलंदाज हतबल होतात. भारताचे क्षेत्ररक्षणही पाकच्या तुलनेत चांगलेच आहे.

- Advertisement -

पाकचा मोहम्मद आमीर घातक ठरतोय. सर्वाधिक 10 बळी त्याच्याच खात्यात जमा आहेेत. 10 पैकी 5 तर ऑस्टे्रलियाविरुध्द आहेत. यंदा वर्ल्डकपसाठी अखेरच्या क्षणी अमीरची संघात वर्णी लागली ती पंतप्रधान इम्रान खान नियाझी यांच्या हस्तक्षेपामुळे ! वर्ल्डकपला सुरुवात होण्यापूर्वी पाक-इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेत इंग्लंडने पाकला 4-0 अशी धूळ चारली. पाकिस्तान निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल रुक यांना फैलावर घेत पंतप्रधान इम्रान खान यांनी मोहमद अमीरची पाक संघात निवड करण्याचे फर्मान काढले. इम्रानच्या ताकदीमुळे अमीरचे वर्ल्डकप तिकीट बुक झाले.

प्रभावी कामगिरी करून अमीरने आपली निवड सार्थ ठरविली. स्विंग, सीम, कटर्सचा बेमालून वापर करुन त्याने फलंदाजांना सतावले. वहाब रियाझचा अपवाद वगळता अमीरला तोलामोलाची साथ लाभत नाही. शिवाय गलथान क्षेत्ररक्षणामुळे पाकची कामगिरी चाांगली होत नाही. 4 सामन्यांतून 3 गुण त्यांच्या खात्यात जमा आहेत. पावसामुळे त्यांचा एक सामना वाया गेला. विंडीजने त्यांच्यावर दणदणीत विजय मिळविला. ऑस्टे्रेलियाकडून त्यांना हार पत्करावी लागली. यजमान इंग्लंडला चकवण्याची कामगिरी त्याांनी केली ती फलंदाजांच्या करामतीमुळे !

कोहलीच्या भारतीय संघाला वर्ल्डकपमध्ये पाकविरुध्द आपली विजयी मालिका अखंडित राखण्यासाठी अष्टपैलू कामगिरी करावी लागेल. फलंदाजीला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची जोड लाभल्यास ओल्ड ट्रॅफर्डवर भारताला विजयाची चव चाखता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -