घरक्रीडावृद्धिमान साहाला दुखापत, टीम इंडियाला झटका

वृद्धिमान साहाला दुखापत, टीम इंडियाला झटका

Subscribe

भारतातील बंगलोरमध्ये १४ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात वृद्धिमान साहाची विकेटकिपिंगसाठी निवड झाली होती. मात्र आता त्याच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकेल की नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे टीम इंडियाला सध्या धक्का बसला आहे.

वृद्धिमानच्या अंगठ्याला दुखापत

- Advertisement -

वृद्धिमान साहाची कसोटी सामन्यामध्ये विकेटकिपिंगसाठी निवड करण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात २५ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या क्वालिफायर २ च्या सामन्यात वृद्धिमानच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सनरायझर्स हैदराबादकडून वृद्धिमान खेळत होता. २७ मे रोजी झालेल्या फायनलमध्ये या दुखापतीमुळे साहाला खेळवण्यात आले नव्हते.

बीसीसीआयची माहिती

- Advertisement -

वृद्धिमानला झालेली दुखापत लवकर बरी होणार नाही असा सध्या रिपोर्ट आला आहे. सध्या वृद्धिमान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआयने) च्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली आहे. सोमवारी बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, साहाच्या दुखापतीकडे सध्या तज्ज्ञ लक्ष देत असून त्यामध्ये काय प्रगती होत आहे यानुसार निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं आहे. साहा पूर्ण फिट नसल्यास, पार्थिव पटेल अथवा दिनेश कार्तिक यांना अफगाणिस्तानविरोधातील कसोटीमध्ये संधी देण्यात येईल असंही स्पष्ट केलं आहे.

अफगाणिस्तानविरोधात या कसोटीला १४ जूनला सुरुवात होणार असून विराट कोहली या सामन्यांमध्ये कर्णधार नसेल. या कसोटीच्या कर्णधारपदाची धुरा अजिंक्य राहाणे सांभाळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -