यासिर शाहची विक्रमी कामगिरी

यासिर शाह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

Abu Dhabi
यासिर शाह

पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शाहने कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ३३ कसोटी सामन्यांतच २०० विकेटचा टप्पा गाठला. त्यामुळे त्याने ८२ वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटच्या नावावर होता. त्याने १९३६ साली आपल्या ३६ व्या कसोटीत २०० विकेटचा टप्पा गाठला होता. यासिरने न्यूझीलंडच्या विल सोमरव्हिलला बाद करत या विक्रमाला गवसणी घातली.


यासिर शाहने आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत. तर तो सध्या त्याचा ३३ वा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ३ विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात त्याने २ विकेट घेतल्या आहेत. त्याने या सामन्याच्या आधी ३२ कसोटी सामन्यांच्या ६२ डावांत १९५ विकेट घेतल्या होत्या. त्याने एका डावात ५ विकेट घेण्याचा विक्रम १६ वेळा तर एका सामन्यात १० विकेट घेण्याचा विक्रम ३ वेळा केला आहे.