घरक्रीडाIND vs AUS : 'आदर करा'! विराट कोहलीच्या निर्णयाला लक्ष्मणचा पाठिंबा

IND vs AUS : ‘आदर करा’! विराट कोहलीच्या निर्णयाला लक्ष्मणचा पाठिंबा

Subscribe

कोहली चार पैकी केवळ एक कसोटी सामना खेळणार आहे.

भारतीय संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली चार पैकी केवळ एक कसोटी सामना खेळणार आहे. कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. कोहलीच्या या निर्णयाची बरीच चर्चा होत आहे. मात्र, त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असे भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मणला वाटते. ‘कोहलीच्या निर्णयाचा आदर केलाच पाहिजे. कोहली व्यावसायिक क्रिकेटपटू आहे, पण सर्वात आधी तो माणूस आहे. त्यालाही कुटुंब आहे. कुटुंबाच्या हितासाठी तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. कोहलीच्या आयुष्यात हा महत्त्वाचा क्षण असणार आहे,’ असे लक्ष्मण म्हणाला. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारीत त्यांच्या पहिल्या पाल्याला जन्म देण्याची अपेक्षा आहे.

२००६-०७ मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना लक्ष्मणच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. तिसरा कसोटी सामना ६ जानेवारी २००७ ला संपल्यावर लक्ष्मण ७ जानेवारीला भारतात परतणार होता. त्याच्या मुलाचा जन्म १० जानेवारीला होण्याची अपेक्षा होती. परंतु, मुलाचा जन्म १ जानेवारीला झाला. त्यामुळे लक्ष्मणला त्याच्या मुलाला पाहण्यासाठी काही दिवस थांबावे लागले. मात्र, काही वर्षांनंतर लक्ष्मणच्या मुलीचा जन्म झाला आणि त्यावेळी पत्नीसोबत राहण्यासाठी तो काही रणजी सामन्यांना मुकला होता. ‘मुलीचा जन्म होताना पत्नीसोबत राहण्यासाठी मी काही रणजी सामन्यांत खेळलो नव्हतो, हे मला अजूनही आठवते. हा कोणत्याही जोडप्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण असतो. खासकरून जेव्हा पहिल्या पाल्याचा जन्म होणार असतो,’ असे लक्ष्मणने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -