घरक्रीडायुवा खेळाडूंनी मिळालेल्या संधींमध्येच स्वतःला सिद्ध करावं - विराट कोहली

युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधींमध्येच स्वतःला सिद्ध करावं – विराट कोहली

Subscribe

भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंनाच संघात स्थान देण्याविषयीचे मतही विराट कोहलीने मांडले.

आगामी टी-२० विश्व चषकासाठी कर्णधार विराट कोहलीने आतापासूनच युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. संघातील युवा खेळाडूंनी त्यांना मिळणाऱ्या चार ते पाच संधींमध्येच स्वतःला सिद्ध करावे, असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली तेव्हा मी सुद्धा मला जास्त संधी मिळतील म्हणून अपेक्षा केली नव्हती, असे म्हणत विराट कोहलीने युवा खेळाडूंपुढे स्वतःचे उदाहरण ठेवले. दरम्यान भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंनाच संघात स्थान देण्याविषयीचे मतही विराट कोहलीने मांडले.

काय म्हणाला विराट कोहली?

पुढील वर्षी टी-२० चा विश्वचषक आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची अपेक्षा असते. याविषयी कर्णधार विराट कोहलीने युवा खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. यासाठी त्याने स्वतःचे उदाहरण दिले आहे. विराट कोहली म्हणाला की, “ज्यावेळी मला संघात संधी मिळाली तेव्हा मीसुद्धा मला १५ संधी मिळतील असा विचार केला नव्हता.” तो पुढे म्हणाला की, “आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी जवळपास ३० सामने होतील. युवा खेळाडूंना ४ ते ५ संधींमध्येच स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्या खेळाडूंची संघात निवड होईल त्यांनी हे लक्षात ठेवूनच खेळावे. कारण सध्या आपण ह्याच स्तरावरील क्रिकेट खेळत असून सध्या भारतीय संघाचीसुद्धा हीच मानसिकता आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचं खेळाडूंनी सोनं करावं.”

- Advertisement -

संघाला पुढे नेणाऱ्या खेळाडूंचीच निवड

“आगामी टी-२० विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी आम्ही टी-२० आणि कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या दरम्यान युवा खेळाडूंना वेळोवेळी जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यामुळे जे खेळाडू भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता सिद्ध करतील अशांनाच संघात स्थान द्यावे लागेल,” असेही कर्णधार विराट कोहली याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -