घरक्रीडायुवा खेळाडूंना वेळ द्यायला हवा!

युवा खेळाडूंना वेळ द्यायला हवा!

Subscribe

वेस्ट इंडिजचे बरेचसे प्रमुख क्रिकेटपटू मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय संघाकडून खेळण्यापेक्षा जगभरातील विविध टी-२० स्पर्धांना पसंती देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे विंडीजच्या संघाची कामगिरी खालावली आहे. मात्र, या संघात आता बरेच नवे युवा आणि प्रतिभावान खेळाडू आहेत.

त्यांना कर्णधार किरॉन पोलार्डसारख्या अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन लाभत आहे. परंतु, हे युवा खेळाडू लगेचच यशस्वी होतील ही अपेक्षा बाळगणे चुकीचे असून त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे, असे मत पोलार्डने व्यक्त केले.

- Advertisement -

ब्रँडन किंग आणि केसरीक विल्यम्स यांनी चांगली कामगिरी केली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) स्पर्धेमुळे आम्हाला आता बरेच युवा खेळाडू मिळत आहेत. ते वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहेत. मात्र, आपण या खेळाडूंबाबत लवकर मते निर्माण करतो, जे योग्य नाही. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे.

तुम्हाला सामने जिंकायचे असतात, पण त्यासाठी युवा खेळाडूंवर दबाव टाकणे योग्य नाही. युवा खेळाडूंना पाठिंब्याची गरज असते. तुम्ही या खेळाडूंना टीकाकारांपासून वाचवले पाहिजे, असे पोलार्ड म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -