युवराज निवृत्ती मागे घेणार, BCCI कडे मागितली रितसर परवानगी!

yuvraj singh
युवराज सिंग

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्याने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तयारी दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी पंजाबकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार झाला आहे. यपवराजने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे रितसर परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराजला पंजाबच्या संघाचा मेंटॉर कम खेळाडू अशी ऑफर दिली होती. पंजाब क्रिकेट असोसिएशनची ही ऑफर युवराजने स्विकारलेली आहे.

‘मी खरतर स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती, पण मला क्रिकेट खेळायचं होतं यासाठी बाहेरील देशातील लिगमध्ये खेळण्यासाठी मी बीसीसीआयची परवानगी मागितली होती. पंजाब क्रिकेट असोसिएशनने केलेली विनंती मी नाकारू शकत नाही, मी यावर ३- ४ आठवडे विचार केला.’

परवानगी दिल्यास टी- २० खेळणार

बीसीसीआयने युवराजला पुन्हा खेळण्याची परवानगी दिल्यास, तो पंजाब संघाकडून फक्त टी-२० क्रिकेट खेळेल. इतर स्पर्धांमध्ये मला सहभागी होता येणार नसल्याचंही युवराजने स्पष्ट केलंय. पंजाबच्या संघाला पुन्हा एकदा जुने दिवस दाखवून विजेतेपद मिळवून द्यायचं हे माझं ध्येय आहे.


हे ही वाचा – युवराज सिंग ‘बिग बॅश लीग’ स्पर्धेत खेळण्यास उत्सुक!